प्रतिनिधी/ पणजी
खनिज प्रक्रिया आणि इतर क्षेत्रांसाठी गोवा सरकार क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियाशी सहयोग करार करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाने काल त्यांची भेट घेतली होती. शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी या कार्यात सरकार आवश्यक सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. खनिज प्रक्रियेसोबतच आदरातिथ्य, फार्मास्युटिकल्स, क्रीडा अकादमी आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा आदी उद्योगांशी संबंधित परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सरकार क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियाशी चर्चा करत आहे.









