Old Pension Scheme Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी गेल्या सात दिवसापासून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकिनंतर संप मागे घेतल्याची माहिती विश्वास काटकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जुनी पेन्शन योजना राज्य़ात लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्यापासून सर्वांनी कामावर हजर रहावे असे आवाहन काटकर यांनी केले. सरकारच्या समितीला पूर्ण सहाय्य करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. सरकारकडून लेखी आश्वासन मिळालं आहे. संप काळात प्रलंबित कामे पूर्ण करणार असल्याचे ही काटकर यांनी सांगितले.
Previous Articleसिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
Next Article …हा विरोधकांचा डाव; पण माझी त्याला हरकत नाही








