ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क धोरणामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. असे असतानाच केंद्राने यावर तोडगा काढण्यासाठी नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा प्रति क्विंटल 2410 रुपयांनी खरेदी करण्याची घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारने नाफेडमार्फत प्रति क्विंटल 2410 रुपये दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र, हा भाव कांद्याचा उत्पादन खर्च काढणाराही नाही. केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणारा नाही. शेतकऱ्यांची 4000 रुपये प्रति क्विंटलची मागणी आहे. कांदा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. सरकारने निर्यात शुल्क कमी करावं, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.