प्रतिनिधी/दापोली
तालुक्यातील पाजपंढरी येथे दहीहंडीच्या पथकात नाचताना वसंत लाया चोगले (वय ५५) या गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाजपंढरी येथेही सालाबादप्रमाणे दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता. अनेक गोविंदा पथके यात सहभागी झाली होती. यामध्ये वसंत चोगले हे देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मात्र नाचत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते जागीच कोसळले. त्यांना त्यांच्या
सहकाऱ्यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू ओढवला. त्यांच्या अचानक जाण्याने पाजपंढरी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.









