ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत बिनविरोध निवड
ओटवणे | प्रतिनिधी
चराठा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोविंद उर्फ राजन हरी परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चराठा उपसरपंच अमित परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. बुधवारी सायंकाळी चराठा सरपंच सौ प्रचिती कुबल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा तेंडोलकर यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच प्रचिती कुबल, सदस्य गौरी गावडे, वृंदा मेस्त्री, श्रावणी बिर्जे, अना डिसोजा, लुईजा मेरी फर्नांडिस आदी उपस्थित होते. यावेळी राजन परब यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचे सांगितले.यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळू परब, शिवसेनेचे युवा नेते क्लेटस फर्नांडिस, राजू कुबल, पप्पू गावडे, नितेश परब, रोहित परब, प्रशांत बिर्जे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजन परब यांचे अभिनंदन केले. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे आदींनी गोविंद परब यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









