मुंबई : ज्येष्ठ नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची हत्या करणाऱ्य़ांची चौकशी आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवावी अशी त्यांच्या कुटुंबाने विनंती केली आहे. पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हा विनंती अर्ज कोर्टात दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा- नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?
न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या खंडपीठा पुढे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट आहे. त्याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे. दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









