वेंगुर्ले (वार्ताहर)-
केळुस मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड केळुस, तालुका वेंगुर्ला या संस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद रामचंद्र केळुसकर तर उपाध्यक्षपदी सौ. प्रज्ञा प्रमोद केळुसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.केळुस मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड केळुस, तालुका वेंगुर्ला या संस्थेच्या संस्थेच्या संस्थेची २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीची पंचवार्षिक निवडकीत सलग चौथ्यावेळी अध्यक्षपदी गोविंद रामचंद्र केळूसकर तर उपाध्यक्षपदी सौ. प्रज्ञा प्रमोद केळुसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
केळुस मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड केळुस, ता. वेंगुर्ला या संस्थेच्या संस्थेच्या संस्थेची २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश धुमाळ यांनी काम पाहिले नुतन संचालक मंडळात सहदेव राऊळ, गणाधिश केळुसकर, रामदास कुबल, लक्ष्मण राऊळ, बाबुराव ताम्हणकर, रामचंद्र पराडकर, कालिदास केरकर, गोविंद केळुसकर, महादेव जोशी, नेहा केळुसकर, प्रज्ञा केळुसकर यांची निवड करण्यात आली आहे.संस्थेचे सभासद, आजी-माजी संचालक, हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्या सर्वांचे मनःपूर्वक चेअरमन गोविंद केळूसकर यांनी आभार मानले आहेत.









