कोल्हापूर :
ध्वज दिनानिमित्त कोल्हापूरने सर्वोच्च ध्वज निधी संकलन करत राज्यात तिसरा क्रमांका मिळविला. याबाबत राज्यापाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूरचा सन्मान करण्यात आला. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन केशव चवदार (निवृत्त) यांनी सन्मान स्विकारला.
देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक जीवाची बाजी लावत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन केला जातो. हे काम म्हणजे देशकार्यच मानले जाते. संकलित होणार निधी सैनिक, माजी सैनिक, शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबासाठी वापरला जातो. सैनिकांसाठी भरघोस निधी जमा व्हावा यासाठी शाळा, महाविद्यालयासह शासकीय कार्यालयातील विविध विभागालाही उद्दिष्ट दिले जाते. सैनिकांसाठी प्रत्येक नागरिक व विद्यार्थी जास्ती जास्त निधी संकलनासाठी प्रयत्न करत असतात. राज्यातील सर्वात जास्त ध्वज निधी संकलन करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातो. कोल्हापूर जिल्हा नेहमी ध्वज निधी संकलनाच्या यादीत टॉपवर असतो.
ध्वज निधी सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 च्या संकलनामध्येही कोल्हापूरने सर्वात जास्त निधी संकलन करत तिसरे स्थान मिळविले. त्यामुळे राजभवन मुंबई येथे आज शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये ध्वजदिन निधी संकलन 2024 ला प्रारंभ झाला. या कार्यक्रमांमध्ये राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन केशव चवदार (निवृत्त) यांचा सन्मान करण्यात आला.








