अखेर वकिलांच्या आंदोलनाला यश
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावात मंजूर झालेले ग्राहक आयुक्त न्यायालय गुलबर्गा येथे हलविण्यात आले होते. त्यामुळे वकिलांनी तीव्र आंदोलन सुरू केले. त्याची दखल सरकारने घेतली. सरकार कडे बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सरकारने नमते घेत बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
यामुळे बार असोसिएशन आणि वकिलांच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले आहेत. याचबरोबर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वकील वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.









