दोन आठवड्यामध्ये प्रक्रिया करणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सरकार आगामी दोन आठवड्यांमध्ये जवळपास 20 महत्त्वाच्या खनिज गटांसाठी निविदा मागवणार आहे, अशी माहिती खाण सचिव व्ही एल कांता राव यांनी दिली आहे. निवीदा काढण्यात येणाऱ्या विविध 20 महत्त्वाच्या खनिज गटांमध्ये लिथियम आणि ग्रेफाइट खाणींचा समावेश होणार असल्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने मागील महिन्यात लिथियम आणि निओबियमसाठी प्रत्येकी तीन टक्के आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांसाठी एक टक्के रॉयल्टी दर मंजूर केले होते. देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची खनिजे महत्त्वाची मानली जातात. हरित ऊर्जेकडे वळताना यांचा वापर महत्त्वाचा असेल.









