गावागावांमध्ये पोहोचविणार एफएम रेडिओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्याचा काळ हा ओटीटीचा आहे. नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार समवेत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म असून यात युजर स्वतःच्या पसंतीची सीरिज किंवा चित्रपट पाहू शकतात. ओटीटीची ही लोकप्रियता पाहता केंद्र सरकार देखील स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म आणणार आहे. तर एफएम रेडिओला गावागावांपर्यंत पोहोचविण्याचीही सरकारची याना आहे. एफएम रेडिओ सेवेकरता सरकार लवकरच लिलाव प्रक्रिया राबविणार असल्याचे माहिती आणि मंत्रालयाचे सचिव अपूर्वा चंद्रा यांनी दिली आहे.
एफएम रेडिओला चालू वर्षी टियर-2 आणि टियर-3 शहरांपर्यंत पोहोचविण्याची सरकारची योजना आहे. भारतात सध्या मोठय़ा संख्येत एफएम रडिओ स्टेशन्स आहेत, परंतु त्यांची सेवा देशाची भौगोलिक स्थिती पाहता 60 टक्केच आहे. 2023-24 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्याचीही आमची योजना आहे. टीव्ही सिग्नल मोबाइल फोनपर्यंत कसे पोहोचावेत याकरता प्रयोगाच्या स्व्रुपात आयआयटी कानपूर आणि संख्या लॅबने कर्तव्यपथ तसेच परिसरात ट्रान्समीटर इन्स्टॉल केले आहेत असे सचिवांनी सांगितले आहे.
मोबाइल फोनवर आता टेलिव्हिजनचे सिग्नल थेटपणे प्राप्त करता येणार आहेत. याकरता मोबाइल युजर्सना एक स्पेशल डोंगल अटॅच करावे लागणार आहे. मोबाइल निर्मिती कंपन्यांना मोबाइलमध्ये एक चिप जोडण्यास सुरू करावे लागणार आहे, यामुळे टीव्ही सिग्नल थेट मोबाइलमध्ये कॅच करता येणार आहेत. सरकारने 4 वर्षांसाठी प्रसारणविषयक पायाभूत सुविधा आणि नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत प्रसार भारतीचा विस्तार करण्याची योजना आखली असल्याचे चंद्रा यांनी सांगितले आहे.









