Sandeep Deshpande : माझ्यावर कुणी हल्ला केला हे मला माहीत आहे.आम्हाला त्यांची नावे कळली आहेत.माझ्यावर हल्ला ज्यांनी केला त्यांना संरक्षण द्या.सरकारने त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी, असा सूचक इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,मी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात पत्रे पाठवले आहे. या महामारीच्या काळातील घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी करण्यात यावी. शक्य नसेल तर मग आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागावर चौकशीची जबाबदारी सोपवावी असेही ते म्हणाले.
Previous Articleदेशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 18 बांग्लादेशींना मुंबईत अटक
Next Article …तर बारावीतील चुकलेल्या प्रश्नांसाठी सहा गुण








