प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News: मोबाईलमधल्या ठराविक गोष्टीं व्यतिरिक्त इतर सुविधा आपल्याला माहिती नसतात. त्याचा वापर आपल्याकडून होत नाही त्याच प्रकारे शासनाच्या अशा अनेक योजना आहेत. ज्या आपल्याला माहिती नाहीत आणि त्याचा आपल्याकडून वापर होत नाही . म्हणून विद्यार्थी, प्राध्यापकांनी योजनांची माहिती घेऊन संशोधन क्षेत्रासाठी त्यांचा योग्य प्रकारे विनिमय करावा, असे आवाहन पाँडीचेरी विद्यापीठाच्या मुख्य रेक्टर आणि लेफ्टनंट राज्यपाल डॉ. तामिलीसाई सौंदराराजन यांनी केले.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर आणि पाँडिचेरी विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाँडीचेरी विद्यापीठाच्या मुख्य रेक्टर,लेफ्टनंट राज्यपाल डॉ.तामिलीसाई सौंदराराजन यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ स्तुतीचे समन्वयक डॉ.आर.जी.सोनकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सोनकवडे यांनी औद्योगिक क्षेत्राला या अत्याधुनिक उपकरणाचा कसा उपयोग होईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यामुळे संशोधक प्राध्यापक आणि उद्योजकांनी एकत्र येऊन मेक इन इंडियामध्ये सहभागी व्हावे आणि अशी अत्याधुनिक साधने विकसित करण्याचा प्रयत्न करावा,असे आवाहन केले.तसेच स्तुति कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक भारतभर वाढत असून काश्मीर पासून वेल्लोर पर्यंत पोहोचले आहे.जोधपूरच्या आयआयटी सारख्या संस्थेमध्ये आणि लखनऊच्या डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर या केंद्रीय विद्यापीठातही स्तुती उपक्रम झाला.गोवा आणि केरळ नंतर आता पुन्हा पाँडिचेरी केंद्रीय विद्यापीठात हा नववा उपक्रम आहे.
कोल्हापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने पाँडिचेरी विद्यापीठाला स्तुती उपक्रमाची संधी मिळवून दिल्याबद्दल डॉ.सोनकवडे यांचे राज्यपाल डॉ.सौंदराराजन व कुलगुरू प्रा.गुरमीत सिंग यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या सीआयएफ केंद्राचे प्रमुख, प्रा. सी. शिवशंकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. माजी प्रमुख प्रा. बाला मणिमरन यांनी आभार मानले. यावेळी पाँडीचेरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गुरमीत सिंग, स्थानिक स्तुति समन्वयक, पंडिचेरी विद्यापीठाच्या सीआयएफ सेंटरचे प्रमुख प्रा. शिवशंकर, माजी प्रमुख प्रा. बाला मणिमरन आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









