बीजिंग
चीनने अमेरिकन कंपनी अॅपलसह इतर देशांच्या उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी फक्त सरकारी अधिकाऱ्यांना लागू असणार असून ही उपकरणे कार्यालयात आणू नका किंवा कामासाठी वापरू नका, असे अधिकाऱ्यांना सरकारकडून सांगण्यात आले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने एका अहवालात हा दावा केला आहे. चीन सरकारने अधिकाऱ्यांना देशात बनवलेले फोन वापरण्यास सांगितले आहे.
प्राप्त अहवालानुसार, चीनने अॅपलशिवाय अन्य कोणत्याही फोन उत्पादक कंपनीचे नाव दिलेले नाही. याबाबत अॅपलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर चीन सरकारने या बंदीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
अॅपलच्या ‘वंडरलस्ट‘ इव्हेंटच्या आधी बंदी
12 सप्टेंबर रोजी कंपनी कॅलिफोर्नियामध्ये वंडरलस्ट इव्हेंट आयोजित करणार आहे अशावेळी चीनने सरकारी अधिकाऱ्यांकडून आयफोन वापरण्यावर बंदी घातली आहे.









