तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी भाजप राज्यपालांचा आपल्या पक्षाचा ‘कार्यकर्ता’ म्हणून वापर करत आहे. असा आरोप करून अलीकडेच भाजपच्या काही नेत्यांनी “संविधानाचे उल्लंघन” केल्याने भारतीय राजकारणाची संघराज्यीय रचना बिघडली असल्याचे अध्यक्ष खर्गे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर मत व्यक्त केले.
तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी सोमवारी ‘तमिळनाडू’ ऐवजी ‘तमिझगम’ हे राज्यासाठी अधिक योग्य नाव आहे, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकीय वादाला तोंड फुटले. सोमवारी तामिळनाडू विधानसभेत राज्यपाल त्यांच्या नेहमीच्या अभिभाषणासाठी पोहोचताच या वादाला सुरुवात झाली. राज्यपाल रवींचा विधानसभेत राज्य सरकारशी सामना झाला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांविरूद्ध अभिभाषणापासून विचलनाविरूद्ध ठराव आणला. यानंतर सभागृहात घोषणा झाल्याने राज्यपालांनी विधानसभेतून वॉकआउट केले.
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये खरगे म्हणाले, “भाजप आपल्या विरोधकांच्या ताब्यात असलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या घटनात्मक कार्यालयाचा वापर पक्षाचा ‘कार्यकर्ता’ म्हणून करत आहे. अशा राज्यपाल कार्यालयांना बदनाम करून भाजप जाणीवपूर्वक लोकशाहीवर घाव घालत आहे. राज्यपालांना राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावे लागते. ते ज्या विधिमंडळाचा भाग आहेत त्यांचा अपमान करू शकत नाहीत. परंतु भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी दिल्लीच्या नेत्यांकडून हेराफेरी केली जात आहे” असा आरोप काँग्रेस अध्यक्षांनी केला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








