मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : अनुकंपा तत्वावर लाभार्थींना नियुक्ती पत्रे वितरित
प्रतिनिधी /पणजी
सरकारी सेवेत दाखल होणाऱया कर्मचाऱयांनी प्रामाणिक राहून जनतेशी व्यवहार करताना मानवतावादी दृष्टिकोन बाळगावा. तसेच जनतेचे सेवक बनून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पर्वरी येथील तंत्रशिक्षण सभागृहात आयोजित कार्यक्रमात लाभार्थींना अनुकंपा नियुक्ती पत्रांचे वाटप आणि जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या नवीन विमानतळावर नियुक्ती आणि विमान कौशल्य विकास केंद्रातील प्रवेश पत्रे प्रदान केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यात पेडणेकरांना प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मोपा विमानतळावर पुढील सहा महिन्यांत अतिरिक्त 500 नोकऱया उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जीएमआरने एव्हिएशन स्किल सेंटरमध्ये सुमारे वीस वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले असून ते त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विविध कुशल व्यावसायिकांसाठी गोव्यात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कौशल्य आत्मसात करून आपण या संधी मिळवायच्या आहेत असे ते म्हणाले. विविध क्षेत्रात व्यक्ती म्हणून प्रगती करण्यासाठी आदरातिथ्य संबंधित अभ्यासक्रमांमध्ये व्यापक संधींची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी तरुणांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पाऊल टाकावे आणि त्यांचे करिअर घडवावे, असे आवाहन केले.
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांनी लाभार्थींनी आपल्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांची काळजी घ्यावी. कार्यकुशलता आणि कौशल्य वाढविण्यासाठी सतत कौशल्य आणि सतत प्रशिक्षण आवश्यक आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्व 21 उमेदवारांना गट ‘क’ मधील अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्रे देण्यात आली आणि 90 लाभार्थींना नवीन विमानतळावरील जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमध्ये नियुक्ती पत्रे देण्यात आली आणि एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरला 150 प्रवेश पत्रे देण्यात आली. यावेळी आमदार प्रविण आर्लेकर यांनीही विचार मांडले.
कार्मिक खात्याचे विशेष सचिव संजीव गडकर आयएएस यांनी योजनेची माहिती दिली. जीएमआरचे सीईओ आर.व्ही शेषन, अवर सचिव श्रीमती. नाथीन अरावजो, लाभार्थ्यांचे कुटुंबीय, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.









