कोरोना काळात अनेकांनी आपले दोन्ही पालक गमावले. डोक्यावरील छत्र कमी झालेल्या अनेक अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकार आता त्यांचे पालक होणार आहे. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रश्न विचारण्याचा एक फायदा होतो की सगळी यंत्रणा गतिमान होते. मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा विद्यापीठ पीएचडी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. संभाजीनगरच्या पीएचडी कॉलेजमध्ये अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याची माहिती यावेळी त्य़ांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








