वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड येथील द. म. शिक्षण मंडळ संचालित महात्मा गांधी हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. सदर क्रीडा स्पर्धा मच्छे येथील केएसआरपी मैदानावर पार पडल्या.
स्पर्धेमध्ये एकूण 9 संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना कडोली संघाबरोबर झाला. यामध्ये गौंडवाड संघाने एक डाव व तीन गुणांनी एकतर्फी विजय संपादन करत प्रथम क्रमांक मिळविला.
सदर संघामध्ये ऋतुजा कुट्रे (कर्णधार), ममता पिंगट, सृष्टी पिंगट, कोमल कुट्रे, संध्या जाधव, संजना पाटील, ममता पाटील, राणी पाटील, नंदिनी पाटील, सुवर्णा पाटील, सुचित्रा पिंगट, मैथिली सांबरेकर यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस. वाय. आंबोळकर यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक पी. ओ. पाटील व इतर शिक्षक व शाळा सुधारणा कमिटी, ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळत आहे.









