वृत्तसंस्था/ ऑकलंड
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या ऑकलंड क्लासिक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना इलिना स्विटोलिनाचा पराभव केला.
महिला टेनिसपटूंच्या मानांकनात सध्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या गॉफने युक्रेनच्या द्वितीय मानांकित स्विटोलिनाचे आव्हान 6-7 (4-7), 6-3, 6-3 असे संपुष्टात आणत जेतेपद पटकाविले. 19 वर्षीय गॉफ आता ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मेलबोर्न येथे 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये गॉफने एकमेव ग्रँडस्लॅम जेतेपद न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पटकाविले आहे. गॉफ आणि स्विटोलिना यांच्यातील हा अंतिम सामना अडीच तास चालला होता.









