नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचे आवाहन, मडगाव पालिकेतील 25 कर्मचाऱ्यांना बढतीची आदेशपत्रे प्रदान
मडगाव : मडगाव पालिकेतील 25 कर्मचाऱ्यांना सोमवारी बढतीची पत्रे देण्यात आली. सर्वांना बढत्या देण्यात आल्या असल्या, तरी लोकांची कामे वेळेत होईल यावर लक्ष केंद्रीत करून सर्वांनी काम करावे, असे यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. आपण प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी पावले उचलणार आहे. त्यासाठी संपूर्ण बदल करावे लागतील. याकामी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी रौनक शंखवाळकर यांच्या हस्ते ही आदेशपत्रे वितरित केली गेली. यावेळी नगराध्यक्ष शिरोडकर यांच्याशिवाय प्रशासकीय अधिकारी अभय राणे, नगरसेवक महेश आमोणकर, नगरसेविका स्वेता लोटलीकर यांची उपस्थिती होती. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत एकूण 34 जणांना विभागीय बढत्या देण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी मंडळाच्या नजरेस आणून दिले होते. यातील 25 जणांना सोमवारी आदेशपत्रे देण्यात आली. उर्वरित 9 जणांना ऑक्टोबर महिन्यात पत्रे देण्यात येतील. काही कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या या बढत्यांसंदर्भातील पत्रे दिली जातील, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यात जुझे फुर्तादो, उमेश परब यांना एलडीसीवरून पालिका निरीक्षक, स्मिता फळदेसाई, जेसिला फर्नांडिस, जेसरॉय डायस यांना एलडीसीवरून यूडीसी, लेस्ली फर्नांडिस, जेस्मिना क्लेमेंत, रामकुमार जामुनी, वेलेन्टिनो फुर्तादो, तुषार वेरेंकर, सचिन वेदप्रकाश लुहेरा, यांना कर्मचारीवरून एलडीसी, तर ज्योकीम फुर्तादो यांना पर्यवेक्षकावरून वरिष्ठ पर्यवेक्षक, संदीप खानापूरकर, क्लारा फर्नांडिस, सॅबेस्त्यांव फुर्तादो यांना पर्यवेक्षक, जुझे डायस यांना साहाय्यक गवंडीपदावरून गवंडी, तर बाप्तिस्त फर्नांडिस, लक्ष्मी हरिजन, नागप्पा मदार, फकिरवा जामुनी, राजू पुजारी, रत्नवा जामुनी, लक्ष्मीबाई जामुनी, महादेवी जामुनी यांना कामगावरून रस्ता कामगार म्हणून बढती देण्यात आली आहे.









