अत्याधुनिक सुविधांसह11 मे रोजी होणार सादर
नवी दिल्ली
गूगल पिक्सल वॉचबाबत मागील काही आठवडय़ांमध्ये बरीच चर्चा होताना दिसली आहे. अखेर गूगलचे पहिले स्मार्टवॉच लाँच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यापूर्वीच याबाबत संकेत व्यक्त केले होते. गूगलचे पहिले स्मार्टवॉच आय/ओ 2022 च्या इव्हेंटमध्ये सादर करण्यात येणार आहे.
गूगलने हा कार्यक्रम 11 आणि 12 मे रोजी होणार असल्याची माहिती दिली आहे. गूगल वॉच लाँचिंग होण्याचे निश्चित झाल्यामुळे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर समोर येत आहेत. पण गूगलने मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. या बाबतची अंदाजीत अधिकची माहिती जाणून घेऊया.
पिक्सल स्मार्टवॉच डिझाइन
पिक्सल वॉचच्या डिझाइनची झलक त्यावरील सर्क्युलर डायल आणि प्रोपायटर स्ट्रिप्सने यापूर्वीच दाखवली आहे. यामध्ये बॅटरी ही जवळपास 300 एमएएच क्षमतेची मिळणार आहे. तर सेल्युलर कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
तीन मॉडेलमध्ये येऊ शकते स्मार्टवॉच
वेबसाइटवरील माहितीनुसार गूगल पिक्सल वॉच मॉडेल नंबर जीडब्लूटी9आर, जीबीझेड4एस आणि जीक्यूएफ4सी आदी मॉडेलचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यामध्ये ब्लूटय़ूथ वाय 5.2 कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच स्मार्टवॉच लेटेस्ट व्हर्जन आरडब्लूडी7 सह सॉफ्टवेअर व्हर्जन नंबर आरडब्लूडी5.211104.001 सोबत लिस्ट करण्यात आल्याची माहिती आहे.









