औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar)आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव होणार यावरून राज्यात सत्तानाट्य सुरु असतानाचं इंटरनेटचे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’ने त्याच्य़ा प्लॅटफाॅर्म नामांतराची घोषणा व्हायच्या आतचं गुगल मॅपनं (Google Map) नावात बदल केल्यानं नवा वाद निर्माण झाला होता. यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटतं आहेत. गुगल मॅपच्या (Google Map)निर्णयाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला होता.
केंद्र सरकारच्या मान्यतेआधीच गुगल मॅपनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असा उल्लेख गुगल मॅपमध्ये केला होता. त्यामुळं औरंगाबादेत नव्या वादाला सुरूवात झाली होती.
गुगल मॅपमध्ये औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर, तर उस्मानाबादचं (Osmanabad) नाव बदलून धाराशिव (Dharashiv) असं केलं होतं. मात्र आता मॅपवर औरंगाबाद असं शोधल्यानंतर संभाजीनगर असा आपोआप रिझल्ट येत होता. मात्र, आता गुगलनं यु-टर्न घेतला असून पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद (Aurangabad) असं नाव कायम ठेवलंय, तर धाराशिवचं उस्मानाबाद केलंय.गुगलनं काही दिवसांसाठी हे नाव का बदललं होतं आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
Previous Articleमहापालिकेची 29 जुलैला आरक्षण सोडत
Next Article महापालिकेचे 60 प्रभाग थेट आरक्षित









