महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Jadhav) यांना त्यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने (Google) आपल्या सर्च पेजवर खाशाबा जाधव याचे डूडल (Doodle) तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. गुगलच्या या उपक्रमाचे सामान्यांमध्ये विशेषता कुस्ती शौकीनांमध्ये कौतुक होत आहे.
भारताचे पहीले ऑलींपिकवीर म्हणुन ओळख असलेल्या खाशाबा जाधव यांनी जपानमधील हेलसिंकी (Helsinki) येथे 1952 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी पदक जिंकून वैयक्तिक प्रकारामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पदक विजेते खेळाडू ठरले. अशा महाराष्ट्राच्या मातीतल्य़ा पैलवानाला अभिवादन करताना डूडलमध्ये त्यांचे स्केच दाखवण्यात आले असून यामध्ये खाशाबा जाधव आपल्या प्रतिस्पर्ध्यावर चढाई करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
गुगलने आपल्या डूडलद्वारे वेबसाइटवर खाशाबा जाधव जाधव याच्याविषयी विस्तृत माहीती दिली आहे. यामध्ये गूगल म्हणते “खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म १९२६ साली महाराष्ट्रातील गोळेश्वर गावात आजच्या दिवशी झाला होता. श्री जाधव यांना त्यांच्या वडिलांकडून कुस्ती खेळाचा वारसा मिळाला. ते गावातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक होते. खाशाबा जाधवांनी आपल्या 10 व्या वर्षी उत्कृष्ट जलतरणपटू आणि धावपटू म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी कुस्तीपटू होण्यासाठी वडिलांकडे प्रशिक्षणास सुरुवात केली. जरी खाशाबांची उंची फक्त 5 फूट 5 इंच असली तरी त्यांच्या चपळतेमुळे ते त्यांच्या हायस्कूलमधील सर्वोत्तम कुस्तीपटू होते.”अशी माहीती गूगलने वाचकांना पुरवली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








