वार्ताहर /किणये
बेळवट्टी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सोमवारी सायंकाळी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अध्यक्षपदी महादेवी मेदार व उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची निवड झाली आहे. तरुण भारत कार्यालयाला भेट देऊन तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी म्हाळू मजुकर, रेणुका सुतार, नीशा चांदीलकर, रुपा सुतार आदी उपस्थित होते.









