पणजी : दै.‘ तरुण भारत’ चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी काल राज्यपाल पिल्लई यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांना ‘वामन वृक्ष कला’ हे स्वत: लिहिलेले पुस्तक भेट दिले. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित, गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर. दुसऱ्या छायाचित्रात किरण ठाकुर यांनी काल केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्रिपदी पुन्हा आरूढ झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती.










