अनेक भाषांमधील पाहतो स्वप्नं
झोप आणि स्वप्नाचा थेट संबंध भाषेशी आहे. चांगली झोप आमच्या भाषेचे कौशल्य देखील चांगलं करत जाते. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कमध्ये झालेल्या संशोधनानुसार दोन रात्रींची झोप आमच्या भाषेत एक नवा शब्द जोडते आणि ही प्रक्रिया हयातभर चालते. झोपेत माणसाचे भाषाज्ञान अपडेट होत असते. दुसऱया शब्दात सांगायचे झाल्यास ऐकले गेलेले शब्द आमच्या भाषाज्ञानाचा हिस्सा ठरतात. यामागील कारण मेंदूची आवाजांबद्दलची संवेदनशीलता आहे.
झोपेत मेंदू आवाज अन् शब्दांशी एकप्रकारे खेळत असतो, वयाच्या 10 वर्षापयंत ही प्रक्रिया अत्यंत वेगाने होत असते. याचमुळे मुलांना पूर्ण झोप घेण्यासाठी सांगितले जाते. मुलांच्या दीर्घ झोपेत भाष शिकण्याची प्रक्रिया चालू राहते.

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कमध्ये झोप, भाषा आणि चेतना लॅबमध्ये मानसशास्त्राचे प्राध्यापक गॅरेथ गॅसकेल यांनी हे संशोधन केले आहे. झोपेत आवाजांची मोठी हालचाल होत असते. याचमुळे आमच्या स्वप्नात देखील अनेक भाषा येत असतात. स्वप्नांमध्ये आपण अनेकदा अशा भाषेचा वापर करतो, जी आपण शिकत असतो. एखाद्या हिंदी भाषिकाला तोकडे-मोडके इंग्रजी येत असल्यास तो स्वप्नात इंग्रजीमध्ये बोलत असतो. स्वप्नात बोलल्या जाणाऱया भाषेचा स्तर त्याच्या वास्तविक क्षमतेच चांगला होतो, कारण स्वप्न पाहत असलेला मेंदू अशा शब्दांचा मोठय़ा प्रमाणात वापर करतो, जे अवचेतन स्थितीत आहेत.
स्वतःला न येणाऱया भाषेतील स्वप्नेही पाहिली जातात, या भाषा आपल्या आसपासचे लोक बोलत असतात. मेंदू अशा आवाजांची ओळख पटवून असतो. अनेक भाषा बोलणाऱया व्यक्तीला अनेकदा बहुभाषिक स्वप्नं पडतात, स्वप्नात एका भाषेचे शब्द दुसऱया भाषेच्या त्याचप्रकारे उच्चार होणाऱया शब्दांसोबत वापरले जातात असे गॅसकेल यांनी सांगितले.

बधिर लोकांची स्वप्नं
अध्ययनात हे देखील आढळून आले आहे की जे लोक मूकबधीर आहेत, त्यांच्या स्वप्नात भाषा नसते. ते इशाऱयांमध्ये बोलत असतात. बहुभाषिक स्वप्नं अनेक स्तरीय असतात. यात एकाचवेळी अनेक भाषा असतात, तर अनेकदा एका भाषेत स्वप्न पडत असतात, परंतु ती मातृभाषा नसते. अनेकदा लिंग्विस्टिक एंक्झाइटी ड्रीम्स देखील येतात. यात माणूस अन्य कुठल्या भाषेत संघर्ष करत राहतो. स्वतःच्या स्वप्नांच्या डिक्शनरीत नवे शब्द शोधतो. त्याच्या मेंदूत असे अनेक शब्द येतात, ज्याचा अर्थ त्यालाच माहित नसतो असे गॅसकेल म्हणाले.
अध्ययनाचे स्वरुप
जेव्हा आम्ही एखादा नवा शब्द शिकतो, तेव्हा तो चांगल्याप्रकारे वापरण्यासाठी स्वतःच्या माहितीशी अपडेट करावा लागतो. याकरता झोपेची गरज असते. झोपेदरम्यानच मेंदू पूर्वीच्या ज्ञानासह नव्या ज्ञानासोबत सामंजस्य निर्माण करू शकतो. अध्ययनात सामील झोपलेल्या उमेदवारांना वास्तविक बोलणे आणि निरर्थक बोलणं ऐकविण्यात येते. ईईजीद्वारे त्यांच्या मेंदूला स्कॅन केले गेले. झोपलेल्या उमेदवारांचा मेंदू केवळ वास्तविक भाषण ऐकत होता. जेव्हा आपण स्वप्न पाहत असतो, तेव्हा मेंदू स्वप्न तुटेल अशाप्रकारचे आवाज ऐकणे बंद करत असतो असे अध्ययनात आढळून आले आहे.









