बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ रवी पाटील यांच्या प्रचारदौऱ्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
मंगळवारी सकाळी कॅम्प येथील भावसार क्षत्रिय समाजाच्या श्री मारुती मंदिरात पूजा करून आपला प्रचार सुरु केला. यावेळी येथील नागरिकांनी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी रवी पाटील यांनी ही समस्यां सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी किशोर खोकले, संजय रनसूबे, अमूल बेद्रे, शेष जवळकर, सुधीर तुपेकर, सुनील जवळकर, मनोज मिरजकर व इतर सहभागी झाले होते.
उमेदवार डॉ रवी पाटील यांची प्रचारपदयात्रा कॅम्प परिसरातील गवळी गल्ली, इंडिपेन्डेन्स रोड, मिल्कमॅन स्ट्रीट, वेस्टस्ट्रीट, हाईस्ट्रीट व इतर भागात झाली. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. याप्रसंगी उपमहापौर रेशमा पाटील व इतर कार्यकर्त्यांनी उमेदवार रवी पाटील यांच्या समर्थनार्थ प्रचार केला.
त्यानंतर कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील स्टाफ क्वार्टर्स परिसरात उमेदवार रवी पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यावेळी भाजप प्रमुख मुरुघेन्द्रगौडा पाटील व इतरांनी भाजपलाच सत्तारूढ करण्याचे आवाहन केले. मतदारांनी उमेदवार डॉ रवी पाटील यांचे आणि त्यांच्या पत्नी सुनीता पाटील उभत्यांचा श्री मरीमाता मंदिर येथे सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ताशिलदार गल्ली येथे प्रचारासाठी गेलेल्या उमेदवार डॉ रवी पाटील यांचा जल्लोषी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी सविता हेब्बार व इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .













