वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामची राजधानी गुवाहाटी येथे रविवारी आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉनला स्पर्धकांकडून चांगलाच प्रतिसाद लाभला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद गुवाहाटीला मिळाले होते. सदर स्पर्धा द कोल इंडिया गुवाहाटीने पुरस्कृत केली होती. या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरूषांच्या विभागात नझिम पुलिकलने तर महिलांच्या विभागात पी. तमंगने विजेतेपद मिळविले.
पुरूषांच्या विभागात ई. नॉनग्रमने दुसरे तर टी. बीयामने तिसरे स्थान पटकाविले. पहिलांच्या विभागात बी. मेरविनने दुसरे तर फुलमोनी उरांगने तिसरे स्थान घेतले. सदर मॅरेथॉनमध्ये सुमारे 5 हजार स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला. सदर मॅरेथॉन विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली.









