वृत्तसंस्था / श्रीनगर
आता उत्तर भारतातील पांजाचा ज्वर जम्मू काश्मिरमध्ये पसरला असून येथे जम्मू काश्मिर स्पोर्ट्स संघटना आणि प्रो पांजा लीग तसेच अखिल भारतीय आर्म रेसलिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने 7 आणि 8 डिसेंबरला झालेल्या आर्म रेसलिंग स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत जम्मू काश्मिरमधील सुमारे 400 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. आशिया चषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता हर्ष शर्मा या स्पर्धेतील आकर्षण ठरला. जम्मू काश्मिरचे क्रीडा मंत्री सतीश शर्मा यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या हर्ष शर्माचा गौरव करण्यात आला.









