बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री को-ऑप. क्रेडिट सोसायटीने वर्धापनदिनानिमित्त सुरू केलेल्या ठेव योजनेला ठेवीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच ठेवीदारांना सोसायटीचे मार्केटिंग ऑफिसर विठ्ठल राजगोळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला. या योजनेला बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी या भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कलाश्री सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांनी सांगितले. ठेव योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, कलाश्री सोसायटीतर्फे 5 वर्षे 9 महिन्यांवरील ठेवीदारांपैकी सोडत काढून विजेत्यांना अनुक्रमे 10 ग्रॅम सोने, 500 ग्रॅम चांदी, 43 इंच एलईडी टीव्ही, कॉर्नर सोफा सेट, 25 हजार रुपये रोख अशी पहिली पाच बक्षिसे देणार आहोत.
याशिवाय कलाश्री ठेव योजनेमध्ये 10 हजार रुपये 5 वर्षे 9 महिन्यांसाठी गुंतवल्यास 20 हजार रुपयांचा परतावा तर 5 हजार रुपये 9 वर्षे 9 महिन्यांसाठी गुंतवल्यास 15 हजार रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे. या ठेव योजनेचा सोडत कार्यक्रम रविवार दि. 20 एप्रिल रोजी उद्यमबाग येथे कलाश्री टॉवरच्या सभागृहात होणार आहे. इच्छुकांना या योजनेमध्ये सहभागी होता येते. तसेच सोसायटीकडे 500 रुपये भरून नवीन सदस्य होणाऱ्यांना 30 रुपये दराने साखरेचा लाभ घेण्याची संधी आहे. यावेळी शेकडो सदस्यांना साखर व प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. सुकन्या डोळेकर यांनी आभार मानले.









