उन्हाळी हंगाम सुसाट : प्रवासी संख्येत वाढ, उत्पन्नात भर
बेळगाव : लग्नसराई, यात्रा-जत्रा, पर्यटन आणि उन्हाळी सुटीमुळे प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या द़ृष्टीकोनातून परिवहनला सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्याप्रमाणे आता परिवहनच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनला चांगले दिवस आले आहेत. सध्या यात्रा-जत्रा आणि लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्याची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या बसेसना प्रवासी वाढू लागले आहेत. खरेदीसाठी बाजारात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बसेसना गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे परिवहनचा दैनंदिन महसूल वाढला आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने कुटुंबासह बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विविध मार्गावर बसेस फुल होऊन धावताना दिसत आहेत.
महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ
शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या ही दुपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात यात्रा उत्सवाना बहर आला आहे. त्यामुळे स्थानिक बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे परिवहनचे उत्पन्ना समाधानकारक वाढू लागले आहे. त्याबरोबर मुंबई, पुणे, बेंगळूर, मंगळूर, बेळळारी, हैद्राबाद व गोवा मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. तर काही बसेस रात्रीच्या प्रवासाला धावू लागले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसना प्रतिसाद वाढला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दैंनदिन 650 हून अधिक बस विविध मार्गावर धावत आहेत. त्यामुळे महसूल वाढू लागला आहे. बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्य लागून असल्याने 40 टक्के महसूल हा महाराष्ट्र व गोवा राज्यात धावणाऱ्या बसमधून मिळतो. त्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत बेळगाव विभाग आघाडीवर आहे. सद्यस्थितीत मुंबई, पुणे, बेंगळूर आणि गोवा येथून सुटीनिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेसना प्रतिसाद मिळू लागला आहे.
परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता
उन्हाळी हंगामात प्रवासी संख्येत वाढ झाली असली तरी परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. काही मार्गावर बसेसचा तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिवहनला अतिरिक्त महसूलापासून दूर रहावे लागत आहे.शिवाय बसचालक, वाहकांची कमतरता असल्याने बस नियोजनात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. एकूण परिवहनच्या उन्हाळी हंगामात बस, बसचालक आणि वाहकांची प्रकर्षाने कमतता जाणवू लागली आहे.
रात्रीच्या प्रवासाठी अतिरिक्त बस
उन्हाळी हंगामासाठी विविध मार्गावर जादा बस धावत आहे. तर काही रात्रीच्या प्रवासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. हंगाम साधण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार बसचे नियोजन केले जात आहे. स्थानिक पातळीवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. तर बुकिंग सेवेला प्रतिसाद वाढला आहे.
-अनंत शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









