राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 9 खेळाडूंची निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत गोमटेश स्कूलच्या प्राथ-माध्यमिक गटातील खेळाडूनी यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 9 खेळाडूंची निवड झाली आहे. जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्षाखालील प्राथमिक गटात हरिष संतोष बेन्नाळकर याने लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक, जय मोरे 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, माध्यमिक विभागात संतोष माळवी 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, पुर्णानंद कामटेने 400 मी. स्पर्धेत द्वितीय, गायत्री कदम थाळेफेकमध्ये व हातोडा फेकमध्ये प्रथम पटकाविला. अक्षरा मजुकरने 800, 1500 व 3000 मी. धावण्याच्या स्पर्धेत तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांकासह तीन सुवर्णपदके त्याचप्रमाणे मुलांच्या रिले संघाने प्रथम क्रमांक त्यामध्ये मनिष मोरे, महेश दळवी, समर्थ माळवी, पुर्णानंद कामटे व वृषभ आदी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. यांना क्रीडाशिक्षक किरण तारळेकर, विठ्ठल यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर मुख्याध्यापक सुनिल पाटील, संजय पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









