वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024-25 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी जमशेदपूर एफसी फुटबॉल संघाने गोलरक्षक अल्बिनो गोम्स बरोबर नुकताच नवा करार केला आहे.
जमशेदपूर एफसी संघाच्या व्यवस्थापकांनी गोम्स बरोबर दोन वर्षांचा नवा करार केला आहे. 2017 च्या फुटबॉल हंगामामध्ये गोम्सची कामगिरी दर्जेदार झाली होती. एwझवाल एफसी संघाकडून खेळताना गोम्सच्या भक्कम गोलरक्षणामुळे एwझवाल संघाने आय लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. 30 वर्षीय गोम्स हा इंडियन सुपर लीग तसेच आय लीग स्पर्धेतील एक अनुभवी गोलरक्षक म्हणून ओळखला जातो. 2013-15 च्या दरम्यान गोम्सने आपल्या फुटबॉल कारकिर्दीला गोव्याच्या स्पोर्टींग क्लूबकडून प्रारंभ केला. त्यानंतर त्याने 2015 साली मुंबई सिटी एफसी संघाकडून इंडियन सुपर लीगमध्ये आपले पदार्पण केले.









