बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व गोमटेश विद्यापीठ मजगाव आयोजित टिळकवाडी विभागीय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात गोमटेश विद्यापीठ हिंदवाडीने ठळकवाडी संघाचा तर मुलांमध्ये गोमटेश हिंदवाडीने केबीएस नंबर 14 संघाचा प्रभाव करून विजेतेपद पटकावले. गोमटेशविद्यापीठाच्या मैदानावरती आयोजित टिळकवाडी विभागीय खो खो स्पर्धेत मुलींच्या पहिल्या ओपन फेरीच्या सामन्यात ठळकवाडी संघाने रजपूत बंधू संघाचा आठ गड्यांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी संघाने एसकेई मराठी संघाचा 7 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोमटेश हिंदवाडी संघाने ठळकवाडी संघाचा 2 गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकविले.
मुलांच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केबीएस नंबर 14 संघाने गोमटेश मजगाव संघाचा टायब्र्रेकर मध्ये एक गड्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी संघाने केबीएस क्रमांक 14 संघाचा 3 गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर गोमटेश विद्यापीठचे संचालक ऋषभ संजय पाटील, गोमटेश हिंदवाडीचे मुख्याध्यापक सुनील पाटील, महांतेश पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोमटेश विद्यापीठ, उपविजेत्या केबीएस नंबर 14 व ठळकवाडी संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश बेळगुंदकर, अनिल जनगौडा, विवेक पाटील, महावीर बुडगौडा, महावीर जनगौडा, बी जी सालोमन, किरण तारळेकर यांनी काम पाहिले.









