माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर : पेडणे तालुका नागरिक समिती, सेव्ह म्हादई संघटनेतर्फे जनजागृती मोहीम
पेडणे: इतर राज्यातील राज्यकर्ते, नागरिक आपल्याला भेडसावणाऱ्या एखाद्या विषयावर एकत्रित येतात. तशाच प्रकरणे समस्त गोवेकरांनी म्हादई वाचविण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. 2016 साली म्हादई वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने ठराव मंजूर झालेला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना कसल्याच प्रकारची तडजोड केली नाही. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन मुख्य राज्यातील मुख्यमंत्र्याची बैठक झाली होती. दोन राज्य मोठी, असताना गोवा राज्य छोटा असला तरी कायद्याची बाजू घेऊन आपण या म्हादई वाचवण्यासाठी आपल्यावर दबाव असतानाही आपण कधी तडजोड केली नाही. कायद्याची लढाई सुरू होती आता पुन्हा एकदा गोवेकरांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटित व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कोरगाव येथे केले. सेव्ह गोवा, सेव्ह टायगर या उपक्रमांतर्गत म्हादई वाचविण्यासाठी पेडणे तालुका नागरिक समितीने सेव्ह म्हादई संघटनेमार्फत पूर्ण पेडणे तालुक्मयातील एकूण वीस पंचायती आणि एक पेडणे नगरपालिका यांना निवेदन देण्यात येईल. या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 26 रोजी कोरगाव ग्रामपंचायतीला पहिले निवेदन देऊन शुभारंभ केला. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर बोलत होते. यावेळी पर्यावरण तज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, सेव्ह म्हादईचे राजन घाटे, बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर, माजी जि. पं. सदस्य दीपक कळंगुटकर, कोरगाव सरपंच समीर भाटलेकर, मरियानो फेर्रांव, नागरिक समितीचे सदानंद वायंगणकर, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, माजी पंच कुस्तान कुएल्हो, अनिल लाड, महादेव पटेकर, विश्वास नारोजी, सेबी रॉड्रिग्स, साईनाथ आपुले, रोहिदास भाटलेकर आदी नागरिक उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पेडणे तालुका नागरिक समिती काही वर्षांपासून कार्यरत आहे. आता त्यांनी म्हादई वाचवण्यासाठी जी राज्यस्तरीय जनजागृतीची मोहीम राबवलेली आहे. ती योग्य पद्धतीने चालणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेमध्ये सर्व गोमंतकीयांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. म्हादई नदीचा विषय हा राज्याच्या हिताचा आहे. या प्रश्नासाठी समस्त गोमंतिकीयांनी पाठिशी राहणे ही काळाची गरज आहे. दरवषी तालुक्मयात पाण्याचा प्रŽ गंभीर आहे. मात्र तालुका नागरिक समितीने घेतलेला विषय हा पेडणे तालुका मर्यादित नसून तो पूर्ण राज्यासाठी आहे. त्यासाठी त्या त्या पंचायतीला निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाद्वारे प्रत्येक पंचायतीने ठराव घेऊन नागरिकांनी त्या ठरावाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावे, शिवाय विविध संस्था, मंदिरे अशा संस्थांनीही ठराव घ्यावे, असेही आवाहन पार्सेकर यांनी केले.
पार्सेकर यांच्या व्याघ्रक्षेत्र निणर्याचा पाठपुरावा होणे गरजचे होते : केरकर
म्हादई वाचविण्यासाठी आणि व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याच्या मागणीसाठी पेडणे तालुक्मयातील कोरगाव या भागातून ही यात्रा सुरू होत आहे. ही एक आनंदाची बाब आहे. कोरगाव गावांमधून नद्या मांद्रे आणि पेडणे तालुक्मयातून वाहत आहेत. नदी संवर्धन ही चळवळ या गावातून सुरू होत आहे. माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे व्याघ्रक्षेत्र जाहीर करणे. हा म्हादई वाचविण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे. पार्सेकर यांच्या व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याचाही निर्णयाचा पाठपुरावा निदान नवीन सरकारने करण्याची गरज होती. त्याची अद्याप दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आताच याबाबत चळवळ न केल्यास पूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती केरकर यांनी व्यक्त केली. राजन घाटे यांनी म्हादई नदी वाचवण्यासाठी गोवा राज्यात जे एकूण 49 ही आमदारांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दीपक कळंगुटकर यांनी या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. सरपंच समीर भाटलेकर कोरगाव गावचा म्हादई बचाव आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगितले. सदानंद वायंगणकर यांनी पेडणे तालुक्मयातील वीस ग्रामपंचायत एक नगरपालिकेला निवेदन दिल्यानंतर पेडणे बस स्थानक येथे जाहीर सभेत रूपांतर होईल, असे सदानंद वायंगणकर म्हणाले.









