प्रतिनिधी /तिसवाडी
गोळवाडा कुंभारजुवे येथे प्रत्येक तीन वर्षांनंतर गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मांडवी नदीत सांगडोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही हा सांगडोत्सव मोठय़ाट उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम पारितोषिक गोळवाडा कुंभारजुवेतील श्री सार्वजनिक सरस्वती उत्सव मंडळाच्या ‘देव वेताळाकडून भूतांचा पुनर्जन्म’ या देखाव्याला मिळाले. यावेळी बाल, अबाल, वृध्द, तरूण तरूणी हा सांगडोत्सव पाहण्यासाठी नदी काठी ठाण मांडून बसले होते.
मिरवणुकीत ‘रक्तबीज महाकाली युध्द’, ‘श्री शिव छत्रपती आणि आध्यात्मिक गुरू – समर्थ रामदास’, ‘श्री शांतादुर्गा महादेव प्रसन्न गोळवाडा कुंभारजुवे येथील देव वेताळाकडून भूतांचा पुनजर्न्म, ‘ए 2 ए डान्स शिबिर‘, ’डीजे रक्तदान’ ‘दौपदी वस्त्रहरण अशा अनेक आकर्षक देखाव्याचा समावेश होता. हे सर्व देखावे होडय़ांच्या सांगडावर साकारले होते. त्याचबरोबर पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे सांगडही होते. यामध्ये व्दितीय पारितोषिक सुरचेभाट कुंभारजुवे येथील सर्वेश इलेव्हन रक्तबीज महाकाली युध्द यांना मिळाले तर चौथे पारितोषिक सुरचेभाट कुंभारजुवे यांनी पटकाविले. आमदार राजेश फळदेसाई यांनी सर्व विजेयी पथकांना बक्षीसे प्रधान करण्यात आली.
यावेळी बक्षीस वितरण सोहळय़ाला आमदार राजेश फळदेसाई, सरपंच विक्रम उर्फ विकी परब, उपसरपंच सचिन गावडे, पंच सदस्य नंदकुमार शेट, सुरेंद्र नाईक, सेजल नार्वेकर, अर्चना परब, विंदा जोशी, सुधीर फडते आदि मान्यवर उपस्थित होते.









