इजिप्तमध्ये एका उत्खननादरम्यान हजारो वर्षे प्राचीन सोन्याची जीभ आणि नखं मिळाली आहेत. या अमूल्य वस्तूंची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. तेथील पर्यटन आणि पुरातन अवशेष मंत्रालयाने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून या शोधाची घोषणा केली आहे. या वस्तू अल-बहनास पुरातत्व स्थळावर मिळाल्या असून जे मिन्या राज्याच्या क्षेत्रात आहे.या कलाकृती प्टोलमिक युगातील असून 305 ख्रिस्तपूर्व ते 30 ख्रिस्तपूर्वापर्यंत मॅसिडोनियाई ग्रीक इजिप्तवर शासन करत होते. हे युग रोमन शासनाच्या प्रारंभासोबत समाप्त झाल्याचा अधिकाऱ्यांचा अनुमान आहे.या थडग्यांमध्ये रा, आइसिस, होरस आणि ओसिरिस यासारख्या प्राचीन इजिप्तिशियन देवतांना चित्रित करणारे विविध ताबीज आणि जार मिळाले आहेत. ज्यात 13 सोन्याच्या मानवी जिभा देखील सामील आहेत. याचमुळे या सर्व गोष्टी प्टोलमिक युगातील असल्याचे कळते.
हे उत्खनन बार्सिलोना विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नामुळे झाले आहे. यात प्टोलमिक युगाची थडगी मिळाली असून ज्यात रंगीत चित्रं आणि शिलालेख सामील आहेत. या शोधामुळे क्षेत्रातील इतिहास आणि त्या काळातील धार्मिक प्रथांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. एका थडग्यात दोन हृदयाच्या आकाराची स्कारब आढळून आले असून जे ममीच्या आत होते. याबरोबर रा च्या स्तंभाची 29 ताबीज, होरस, ठोथ आणि आइसिस यासारख्या देवतांच्या स्कारब आणि तीन देवतांचे संयुक्त प्रतीकही मिळाले आहे. उत्खननात एक आयताकृती दगडाची दफन विहिरही मिळाली जी मुख्य कक्षाकडे नेणारी आहे. तेथे तीन कक्षांमध्ये अनेक ममी एकत्र आढळून आल्या. ज्या प्राचीन सामूहिक दफनभूमीचा संकेत देतात. एका कक्षाच्या भिंतीवर थडग्याचा मालक आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्य अनुबिस, ओसिरिस, होरस, अटम आणि ठोथ देवतांसमोर चित्रित करण्यात आले आहेत.
उत्खनन सुरूच राहणार
छतावर देवतेचे एक चित्र असून यात पांढऱ्या रंगाने चित्रित निळ्या पार्श्वभूमीवर तारे आणि पवित्र पात्र दाखविण्यात आले आहे. जे खप्रि, अटम आणि शारा यासारख देवतांना नेत आहे. यापूर्वीही या स्थळी युनानी आणि रोमन काळातील थडगी, प्राचीन कॅथोलिक बेसिलिका आणि ओसिरियन मंदिराचा शोध लागला आहे.









