वार्ताहर/उचगाव
नेपाळमध्ये झालेल्या संयुक्त भारतीय फौडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताच्या अमित लक्ष्मणराव पाटील यांनी हर्डल्स रेस,पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक तसेच 400 मी. व 200 मी. मध्ये रौप्य अशी चार पदकांची कमाई केली. यामुळे कर्नाटकासह बेळगाव जिह्याचे नाव उज्ज्वल करत, उचगाव गावची शान त्यांनी वाढवली आहे. अमित पाटील हे उचगाव गावचे सुपुत्र असून त्यांनी उचगाव प्राथमिक मराठी शाळा आणि मळेकरणी हायस्कूल उचगाव येथे आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मालाड पश्चिम येथे मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसेसमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. उचगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य लक्ष्मणराव पाटील व साधना पाटील यांचे ते चिरंजीव होत. त्याचे कौतुक होत आहे.









