मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखील बेळगाव येथे 24 डिसेंबर 1924 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. या घटनेला यंदा शतकपूर्ती होत असल्याने येत्या 24 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये शतक महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
पत्रकारिता विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना बेंगळूरमधील गांधी जयंती कार्यक्रमात ‘गांधी सेवा’ पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. बेळगावमध्ये 1924 रोजी काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. याचा शतक महोत्सव साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम बेळगावमध्ये होणार आहे, असे त्यांनी सांगितले.









