वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी हॉकी इंडियाच्या दुसऱ्या लीग स्पर्धेसाठी सूरमा हॉकी क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी बेल्जियमचे ऑलिम्पिक हॉकीपटू फिलिप गोल्डबर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरमा हॉकी क्लबच्या प्रशिक्षकवर्गामध्ये यापूर्वी अर्जेंटिनाचे ऑलिम्पिक हॉकीपटू इग्नासिओ बर्जनर यांचा समावेश होता. आता ते या संघाचे अॅनॅलेटिकल प्रशिक्षक म्हणून राहतील. सूरमा हॉकी क्लबचे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक जेरॉन बार्ट हे आता हॉकी सल्लागार म्हणून राहतील. सूरमा हॉकी क्लब दर्जेदार आणि भक्कम होण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. गोल्डबर्ग यांच्यावर युरोपियन पदक विजेत्या 21 वर्षांखालील वयोगटाच्या आणि वरिष्ठ संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2026 च्या हॉकी लीग स्पर्धेला 4 जानेवारीपासून चेन्नईत प्रारंभ होणार आहे. हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली सूरमा हॉकी क्लबचा या आगामी मोहिमेतील सामन्याला चेन्नईत 4 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.









