मुंबई : मुंबईच्या छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय विमानतळावर आज कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने विमानतळावर 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त केले असून याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाची ही करावाई आजपर्यंतची एका दिवसात केली जाणारी सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे. सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या सात आरोपीमध्ये दोन महिलांचा समावेश असून सर्वजण कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते. त्यांना भारतात सोने आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते असे प्राथिमक चौकशीत आढळले आहे. त्यांना भारतातील सीमाशुल्क कायद्याबाबत माहिती नसल्याने हे सर्व जण एवढं सोनं घेऊन आले आहेत. प्रवाशांनी घातलेल्या जीन्सच्या पँटच्या बेल्टमध्ये सोने अत्यंत कल्पकतेने लपवले असल्याचे दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








