भोगावती/प्रतिनिधी
चांदे ता राधानगरी येथील सोने पाँलीश करण्याच्या बहाण्याने ते केमिकलमध्ये वितळून ६४ हजार रुपयांचे सोने लंपास करण्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे.याबाबत सौ.वंदना दिनकर भिसे (वय ३८) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात रात्री उशिरा तक्रार दाखल केली.यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची समजलेली अधिक माहिती अशी की,चांदे येथे साधारण २५ वयोगटातील तरुण सोने पाँलिश करण्यासाठी सायंकाळी आला होता.तो हिंदी व मराठी भाषेत अडखळत बोलत होता.गावातील सौ.वंदना दिनकर भिसे यांनी आपल्या साडेतीन तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या त्याच्याकडे पाँलिश करण्यासाठी दिल्या होत्या,त्याने या पाटल्या केमिकलमध्ये घालुन व चकचकीत करून सौ भिसे यांच्याकडे परत देऊन निघुन गेला.त्याने दिलेल्या पाटल्यांच्या वजनाबाबत शंका आल्याने वजन केले.त्यावेळी पाटल्यातील दीड तोळे सोने वितळून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत सौ भिसे यांनी अज्ञाताविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद केला.याबाबतचा अधिक तपास पो.नि.ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सौ.रानगे या करीत आहेत.