राष्ट्रीय खुली अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळविणारी भारतीय नौदलाची अॅथलीट अॅन्सी सोजनने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या लांब उडीत सुवर्णपदक पटकावले.
सोजनने 6.71 मी. लांब उडी घेत पहिले स्थान निश्चित केले. तिची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. या 23 वर्षीय अॅथलीटला या चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम अॅथलीटचा पुरस्कारही मिळाला. मागील वर्षी चीनमधील हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सोजनने 6.63 मी.ची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्यपदक मिळविले. त्यावेळी चीनच्या शिकी झिआँने सुवर्ण व हाँगकाँगच्या एन्गा यानने कांस्यपदक मिळविले होते. त्या स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी नोंदवत 28 सुवर्णांसह एकूण 107 पदके मिळविली होती.









