वृत्तसंस्था/ &रिओ डे जेनेरिओ (ब्राझील)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक महिला नेमबाज इलावेनिल व्हॅलेरीवनने महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत इलावेनिलने 252.2 गुणासह सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेतील भारतचे हे पहिले सुवर्णपदक आहे. या क्रीडा प्रकारात फ्रान्सच्या ओसेनी मुलेरने 251.9 गुणासह रौप्यपदक तर चीनच्या झेंगने 229.0 गुणासह कास्यपदक घेतले. या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या संदीप सिंगला पात्र फेरीमध्ये 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. सदर स्पर्धेत 16 जणांचा भारतीय संघ सहभागी झाला आहे. स्पर्धेच्या पदकतक्त्यात इटलीने 2 सुवर्णासह आघाडीचे स्थान मिळवले आहे तर भारत अर्मेनियासमवेत संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहे.









