वृत्तसंस्था / बरेली
येथे झालेल्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियन स्पर्धेचे सांघिक जेतेपद सेनादलाने सलग तिसऱ्यांदा पटकाविले. मात्र हिमाचलप्रदेशच्या अभिनाश जमवालने विद्यमान विजेत्या शिवा थापाचा पराभव करत सुवर्ण पदक पटकाविले. वंशराज कुमारने रेल्वेच्या अमितला नमवून सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेत सेनादलाच्या सचिन सिवाच, लक्ष्य चहर यांनी आपल्या वजन गटात सुवर्ण पदके घेतली. सिवाचने पंजाबच्या निखिलचा तर चहरचा दिल्लीच्या ध्रुव सिंगचा अंतिम सामन्यात पराभव केला. मनीष राठोडने सेनादलाच्या पवन बर्तवालचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. वेल्टरवेट गटात निखिल दुबेने दीपकला नमवून सुवर्णपदक पटकाविले. व्रुसरवेट गटातील सुवर्ण पदक सुमितने मिळविताना सेनादलाच्या जुगनुचा पराभव केला. सुपरहेवीवेट गटातील सुवर्णपदक नरेंद्रने पटकाविताना हरियाणाच्या गिलला नमवविले. या स्पर्धेत सेना दलाने सांघिक जेतेपद मिळविताना 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कास्य अशी एकूण 9 पदकांची कमाई केली.









