सीबीआय-एनआयएची संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने सोन्याच्या तस्कराला पकडण्यासाठी एनआयएला मदत केली आहे. आरोपीविऊद्ध इंटरपोलची नोटीस जारी करण्यात आल्यानंतर एनआयएने सीबीआयच्या मदतीने त्याला सौदी अरेबियातून अटक करून भारतात आणले. सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन्स सेंटरने इंटरपोल वाहिन्यांच्या मदतीने मोहब्बत अली नामक तस्कराला भारतात आणण्यासाठी एनआयएशी समन्वय साधल्यानंतर तो जाळ्यात सापडला आहे. या कारवाईपूर्वी इंटरपोलकडून मोहब्बत अलीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सोने तस्कर मोहम्मद अली याला गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी सौदी अरेबियातून भारतात आणण्यात आले आहे. मोहब्बत अली हा अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी वाँन्टेड म्हणून एनआयएच्या निशाण्यावर होता. 13 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्याविऊद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मोहब्बत अलीवर रियाध, सौदी अरेबियातून भारतात सोन्याच्या बारांची अवैध तस्करी केल्याचा आरोप आहे. एनआयएने त्याच्याविऊद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याला आता सौदी अरेबियातून अटक करून भारतात आणण्यात आले आहे. एनआयएने जुलै 2020 मध्ये त्याच्याविरुद्ध सोन्याच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरमध्ये मोहब्बत अलीसह 18 जणांची नावे आहेत. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 10 जणांकडून 18.5 किलो वजनाचे सोन्याचे बार जप्त केले होते. या प्रकरणात मोहब्बत अली हाही ‘वॉन्टेड’ होता.









