वार्ताहर/हिंडलगा
येथील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या भागातील सर्व ग्राहकांसाठी सोनेतारण कर्ज योजनेचा शुभारंभ गुरुवार दि. 10 रोजी उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापक सचिन कावळे तर प्रमुख अतिथी रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, उद्घाटक निवृत्त मुख्याध्यापक व लोकमान्य वेल्थ अॅडव्हायझर सदस्य प्रकाश बेळगुंदकर व इतर शिक्षक उपस्थित होते. सोसायटी कर्मचारी राही जाधव यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी देसाई, शशीधर शिवन्नवर, राहुल उंडाळे यांच्या हस्ते उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला सेवांतर्गत व निवृत्त शिक्षकांचा सहभाग होता. उद्घाटक प्रकाश बेळगुंदकर यांनी आपल्या भाषणात, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी या भागात शेतकरी वर्गासाठी अनेक शाखा स्थापन करून विविध स्तुत्य उपक्रम राबविलेले आहेत, असे सांगितले. विनायकनगर शाखेचे व्यवस्थापक किशोर हळदणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पारस पाटील, ओमकार कुलकर्णी, गजानन राजगोळकर, तंगणकर, अभय गायकवाड व सुनील अगसगेकर उपस्थित होते.









