चांदी दरातील कपातीमुळेही दिलासा
वृत्तसंस्था /मुंबई, नवी दिल्ली
सोन्या-चांदीच्या दरात गुऊवारी सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यातील सलग चौथ्या दिवशी गुऊवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. गुऊवारी सोने 244 ऊपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 684 ऊपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली. सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत असल्याने खरेदीदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू पाहायला मिळत आहे. ‘गुड रिटर्न्स’वरील दरांनुसार मुंबईमध्ये गुऊवारी 24 पॅरेट सोनेदरात प्रतितोळा 380 ऊपयांची कपात झाली असून हा दर दिवसअखेर 59,670 ऊपये इतका नोंद झाला. तर चांदीदरात 900 ऊपयांची घट झाली असून हा दर प्रतिकिलो 73,100 पर्यंत खाली आला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, गुऊवारी सोनेदर 59,020 ऊपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 591 ऊपयांनी स्वस्त होऊन 59,264 ऊपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. सोन्याबरोबरच चांदीही 684 ऊपयांनी स्वस्त झाली असून 71,421 ऊपये प्रतिकिलो इतका दर दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदी घसरणीसह व्यवहार करत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याचा भाव 10.25 डॉलरने घसरून 1,935.06 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 0.43 डॉलरने घसरून 23.50 डॉलर प्रतिऔंसवर व्यवहार करत आहे.









