Ratnagiri News: रत्नागिरीतील प्रसिद्ध नेमबाज पुष्कराज इंगवले हा मित्रासह शिकारीला गेलेला असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजापूर तालुक्यातील कशेळी बांध येथे रंगेहात पकडले.त्याच्याकडून मारलेला डुक्कर जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी नाटे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पुष्कराज इंगवले याने पुणे बालेवाडी येथे नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
रत्नागिरी झाडगाव एमआयडीसी येथे पुष्कराज जगदीश इंगवले (36) व जाकीमिऱ्या येथील त्याचा मित्र रोहन रामदास बनप यांच्यासह सेंट्रो गाडी घेऊन कशेळी गावकडी परिसरात शिकारीसाठी गेले होते. शनिवारी रात्री १२ वा. डुकराची शिकार करून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी गस्त घालत राजापूरच्या दिशेने जात होते.
कशेळी बांध परिसरात सेंट्रो गाडी संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली.त्यांनी चौकशी केली असता सिंगल बॅलर बंदूक दिसून आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गाडीची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीमध्ये मेलेला डुक्कर आढळून आला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









