Gold medal to Utkarsh Malik for her beautiful choreography of Marathi Lavani in the National Dance Championship
जम्मू- कटरा येथे आयोजित झालेल्या राष्ट्रीय डान्स चॅम्पियनशिप मध्ये मराठी लावणीची सुंदर कोरिओग्राफी केल्याबद्दल दोडामार्ग बाजारपेठेतील उत्कर्ष उमेश मळीक हिला गोल्ड मेडल मिळाले आहे.पर्वरी गोवा येथील निर्भयभव डान्स अकॅडमी तर्फे एकूण १५ कलाकारांचा समूह डान्स स्पर्धेसाठी जम्मू-कटरा येथे गेला होता. यामधील सुदेश साळगावकर यांनी ग्रुप डान्सची कोरिओग्राफी केली होती. हि नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा होती. जनरल जोरावर सिंग यांनी या डान्स ग्रुप ट्रिब्यूट दिला. त्यांच्या ट्रिब्यूटमुळे सर्व प्रेक्षक वर्ग खूप भावुक झाले होते. या ग्रुपने गोल्ड मेडल मिळून इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये प्रवेश मिळविला आहे. एका मराठी लावणीची सुंदर कोरिओग्राफी केल्याबद्दल येथील बाजारपेठेतील उत्कर्षा मळीक हिलासुद्धा गोल्ड मेडल मिळाले. उत्कर्षाने पेडणे गोवा येथील एका बारा वर्षीय चिमुकलीच्या मराठी लावणीची सुंदर कोरिओग्राफी केली होती. त्याबद्दल तिला हे मेडल मिळाले. याच ग्रुपमधील अन्य कलाकारांना देखील २२ गोल्ड मेडल मिळाली आहेत. येथील बाजारपेठेतील पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नवरात्र उत्सवात उत्कर्षाने दांडिया गरबा नृत्य तसेच स्टेज शो कलाकार म्हणून आपल्या डान्स कारकीर्दीला सुरुवात केली होती. सध्या ती निर्भयभव डांस अकॅडमी तर्फे दोडामार्गात डान्सचे क्लासेस घेत आहेत. तिने मिळविलेल्या गोल्ड मेडल बद्दल शहरातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी तसेच सातेरी-पिंपळेश्वर महिला मंडळाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दोडामार्ग – वार्ताहर









